शिक्षण क्षेत्रातील मानाचा तुरा: उपक्रमशील शिक्षक श्री योगेश चांदणे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान २०२६’ ने भव्य गौरव…!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपुर:- १४ मे २०२६
अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा (MSP) स्तुत्य उपक्रम. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे उपक्रमशील शिक्षक श्री योगेश चांदणे सर यांचा एका अत्यंत भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शिक्षक पॅनल (MSP) च्या वतीने आयोजित करण्यात आलेला मानाचा ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार २०२६ त्यांना 12 मे 2026 रोजी श्री साईबाबा संस्थानच्या सांस्कृतिक भवन शिर्डी येथे प्रदान करण्यात आला आहे.
हा नयनरम्य पुरस्कार वितरण सोहळा कला, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांच्या मांदियाळीत पार पडला. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले सुप्रसिद्ध कवी रोहित शिंगे, श्रीमती गुंजन पाटील महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे (MSP) अध्यक्ष श्री. दीपक चामे आणि राज्य समन्वयक श्री. भास्कर डोसे यांच्या शुभहस्ते श्री योगेश चांदणे सर यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सोहळ्यातील विशेष उपस्थिती:
या अभिमानास्पद आणि आनंददायी क्षणी बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे बुलढाणा जिल्हा समन्वयक श्री. अनिल धनभर श्री. मनोहर खंडेराव आणि श्री. हरिहर मानकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून या सोहळ्याची शोभा अधिकच वाढवली. जि. प. मराठी प्राथमिक शाळा काकोडा येथे कार्यरत असलेले श्री. चांदणे सरांनी आपल्या कल्पक आणि विद्यार्थी-केंद्रीत उपक्रमांमधून जे अमूल्य योगदान दिले आहे, त्याचीच ही एक मोठी आणि कौतुकास्पद पोचपावती आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे सर्वत्र आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल आणि गौरवाबद्दल उपक्रमशील शिक्षक श्री योगेश चांदणे सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील यशस्वी व प्रेरणादायी वाटचालीस अनंत शुभेच्छा….!



