खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

आमदारांच्या सूचनांनंतरही ठोस उपाय नाही; शिंदखेड्याचा प्रश्न कायम

. शिंदखेडा अंधारात; वायरमन गैरहजर, ग्रामस्थांनीच घेतली वीजकामांची धुरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस | प्रतिनिधी : विनोद तायडे | ता. रावेर

तालुक्यातील शिंदखेडा गावात वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, संबंधित वायरमन गेल्या चार महिन्यांपासून कामावर हजर नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, वारंवार वीज खंडित होत असून संपूर्ण गावाचा कारभार अक्षरशः वाऱ्यावर असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.शिंदखेडा गावाचा वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (ग्रामीण, रावेर) यांनी वायरमनची नियुक्ती केली आहे. मात्र प्रत्यक्षात संबंधित कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून गैरहजर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे लहानसहान बिघाडांपासून ते डीपीवरील कामांपर्यंत सर्व बाबींमध्ये अडचणी निर्माण होत आहेत.

दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दिवसभर आणि संध्याकाळी उशिरापर्यंत गावाचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित होता. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी स्थानिक आमदार अमोल जावळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. आमदारांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत शिंदखेड्यात वायरमन पाठवून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात डीपीवरील काही कामे करण्यात आली; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही.जीव धोक्यात घालून कामवीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री-अपरात्री गावकरी स्वतःच डीपीवर जाऊन लाईन दुरुस्तीचे काम करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

अशा वेळी एखादी जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.पगार कोणाच्या खिशात?ग्रामस्थांचा आरोप आहे की, कर्मचारी कामावर नसताना त्यांचा पगार नेमका कोणाला जातो? कोणाच्या आशिर्वादाने शिंदखेडा गाव अंधारात ठेवले जात आहे? याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.शिंदखेडा येथील नागरिकांनी ग्रामीण रावेर येथील कार्यालयात तक्रार नोंदवूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. उलट, रोजंदारीवर जादा पैसे देऊन खाजगीरीत्या कामे करून घ्यावी लागत असल्याने ग्रामस्थ आर्थिक व मानसिक त्रास सहन करत आहेत.प्रश्न अनुत्तरितचशिंदखेडा गावाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत कधी होणार? यासाठी कोणते ‘पंचांग’ पाहावे लागणार का? अशी उपरोधिक चर्चा गावात रंगू लागली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि गावाला दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button