संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५७० वी जयंती फार मोठ्या उत्साहात संपन्न!!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत.
संग्रामपूर, (हिंगणा) दि.१/५/२०२६ रोजी संग्रामपुर तालुक्यातील हिंगणा कवठळ येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५७० वी जयंती फार मोठ्या उत्साहात आणि जल्लोष साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ बबीता दिनेश उमाळे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदा दिनेश चोपडे ह्या होत्या. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंगणा गावातील प्रतिष्ठित नागरिक अनिल उमाळे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला संदेश प्रमुख उपस्थित जनसमुदायाला संबंधित केला. तसेच आपल्या प्रास्ताविक पर भाषणामध्ये कुमारी पायल गावंडे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी समाजाला दिलेला त्यागाचा आणि दुःख कशाप्रकारे निर्माण केले जाते आणि ते दुःख निवारण्याचे साधने कोणते आहेत यावर त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. कार्यक्रमात हिंगणा गावातील सर्व बौद्ध उपासक सुजाता महिला मंडळ तसेच नमो बुद्ध महिला मंडळ मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या शेवटी प्रणव मुकुंदा गावंडे यांनी आभार प्रदर्शन केले



