भर उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी व पालकांना मोठा फटका

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:-सागर रावणचोरे तालुका प्रतिनिधी शेगाव
राजुरा:-27 एप्रिल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेली उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 27 एप्रिल रविवारी 2026 रोजी पार पडली इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची परीक्षा असून, राज्यभरातील हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. या परीक्षेचा पहिला पेपर 11 ते 12:30 या वेळेत मराठी व गणित या विषयाचे एकूण 75 प्रश्न 150 गुणासाठी होते. त्यानंतर दुसरा पेपर दुपारी 2 ते 3:30 या वेळेत इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयाचा होता. त्यातही 75 प्रश्न 150 गुणासाठी ठेवण्यात आला होता. मात्र एप्रिल महिन्यातील कडक उन्हामध्ये उन्हामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेषतः दुपारच्या सत्रात परीक्षा असल्याने उष्णतेचा प्रचंड तडाखा बसंत होता. अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व थंडावा देणाऱ्या सुविधांची कमतरता जाणवत होती. लहान वयातील विद्यार्थी भर उन्हात परीक्षा देताना थकलेले दिसत होते. काही पालकांनी या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली आहे. दुपारच्या वेळेस परीक्षा
ठेवण्याऐवजी सकाळीच दोन्ही पेपर घ्यायला पाहिजे होती असे पालकांचे मत होते. परीक्षा केंद्रावर पुरेशा सावलीची व पाण्याची सोय नसल्याचेही सांगण्यात आले. तसेच अनेकांनी शाळेच्या परिसरातील हिरव्यागार वृक्षाच्या सावलीचा आसरा घेत वेळ काढला. दोन पेपरच्या मध्ये दीड तासाची विश्रांती असल्याने अनेक पालक आपल्या मुलांची वाट बघत परीक्षा केंद्रावर थांबून राहिले. अशातच परिसरातील वृक्षांनी दिलेली छाया नक्कीच त्यांना सुखावह ठरली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून पुढील काळात तरी या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



