पोलीस स्टेशन चिखली शांतता समिती मिटिंग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली प्रतिनिधी
आरुणा दत्तात्रय खंडागळे
पोलीस स्टेशन चिखली हद्दी मध्ये दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याने त्या अनुषंगाने आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी पोलीस स्टेशन चिखली आवारात शांतता समितीची मीटिंग घेण्यात आली आहे.
सदरची मीटिंग श्री अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे उपस्थितीमध्ये घेण्यात आली असून सदर मिटींगला श्री सवडे तहसीलदार चिखली, श्री अर्जुन इंगळे, उपमुख्याधिकारी नगरपरिषद चिखली, श्री पोपळे साहेब पंचायत समिती चिखली, श्री भूषण गावंडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चिखली, श्री जयसिंग राजपूत सपोनी पोलीस स्टेशन अमडापूर व इतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यासह श्री पंडितराव देशमुख नगराध्यक्ष चिखली तसेच पोलीस स्टेशन चिखली हद्दीमधीलपोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार बांधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते.
सदर मीटिंगमध्ये आगामी सण उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुका कोणताही सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता शांततेत शांततेत पार पाडण्याबाबत तसेच कोणतेही थोर पुरुषांचा पुतळा शासनाची परवानगी घेऊनच बसवावा विनापरवाना पुतळा बसविण्यात येऊ नये याबाबत पोलीस श्री अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक यांनी सर्वाना मार्गदर्शन केले. तसेच श्री सवडे साहेब तहसीलदार चिखली यांनी सुद्धा सर्वांना मार्गदर्शन केले असून चिखली शहराच्या वतीने श्री पंडितराव देशमुख नगराध्यक्ष चिखली यांनी सदरचा सण-उत्सव कोणताही सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होऊ देता शांततेत पार पाडण्याबाबत चिखली शहराच्या वतीने आश्वासन दिले.
सदरची शांतता समितीची मीटिंग 18.00 ते 19.00 दरम्यान घेण्यात आली असून सदर मिटींगला 225 ते 250 शांतता समितीचे सदस्य व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
गोपनीय चे पोहेकॉ प्रकाश शिंदे, तसेच पोहेकॉ विजय किटे यांचे उत्कृष्ठ नियोजना मध्ये मिटिंग पार पडली. ✒️



