बुलढाणामहाराष्ट्र

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त चिखलीत अभिवादन; महिला व बालकल्याण कार्यालयात कृतज्ञतेने स्मरण….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- शारदा संजय पवार चिखली

चिखली:- ११ एप्रिल २०२६
सामाजिक समता, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त चिखली येथील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या महिला व बालकल्याण कार्यालयात अभिवादना चा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण केले. समाजातील वंचित, शोषित घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य आणि स्त्री शिक्षणासाठी घेतलेले परिश्रम यांची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली.
कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांच्या आदर्शांचा समाजाने अंगीकार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. स्त्री शिक्षण, जातीय समता आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांतील त्यांच्या योगदानामुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाल्याचे वक्त्यांनी नमूद केले. या प्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात करण्यात आले. शेवटी सर्व उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प केला. “क्रांतीसूर्यांच्या विचारांचा जागर; अधिकारी व कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती”.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button