Uncategorizedमहाराष्ट्रविदर्भसामाजिक

दि. ६ ऑगस्टला राज्य निवृत्ती वेतन धारकांसाठी नियोजन भवन जिल्हाधिकार्यालय अकोला येथे आढावा बैठक ! अकोला जिल्ह्यातील सर्व पेन्शनर्सना उपस्थित राहण्याचे असोसिएशनचे आवाहन

दि. ६ ऑगस्टला राज्य निवृत्ती वेतन धारकांसाठी नियोजन भवन जिल्हाधिकार्यालय अकोला येथे आढावा बैठक ! अकोला जिल्ह्यातील सर्व पेन्शनर्सना उपस्थित राहण्याचे असोसिएशनचेआवाहन!

वि म घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

अकोला दि. ६ ऑगस्ट |
महाराष्ट्र राज्य शासन निवृत्ती वेतन धारकांसाठी (पेन्शनर्स ) ची सभा , मेळावा / आढावा बैठक उद्या बुधवार दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे . ज्यामध्ये निवृत्ती वेतन धारकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी अकोला जिल्हा कोषागार अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये जिल्हा कोषागार अधिकारी माधवराव झुंजारे
, अप्पर कोषागार अधिकारी सुनील जाधव तसेच अप्पर कोषागार अधिकारी निवृत्ती वेतन विभाग श्रीमती सविता भगत हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत . तरी अकोला जिल्ह्यातील सर्व राज्य निवृत्ती वेतन धारकांनी सोबतच कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी (पेन्शनर्स नी) उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अकोला जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. सत्यनारायण बाहेती, उपाध्यक्ष रामभाऊ बिरकड आणि सचिव एकनाथराव उके यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button