खानदेशमहाराष्ट्रमुक्ताईनगर

मेळसांगवे येथील युवा शेतकरी संदीप सोनवणे यांची केळी दुबईला रवाना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी


परिश्रम, मार्गदर्शन आणि आधुनिक बागायतीचा आदर्श नमुना
मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे येथील युवा शेतकरी संदीप वना सोनवणे (धोबी) यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर घेतलेल्या केळी उत्पादनाला देशाबाहेर थेट दुबईपर्यंत बाजारपेठ मिळाली आहे. परदेशी बाजारपेठेत स्थानिक शेतमाल पोहोचवून गावाचे नाव उंचावणाऱ्या संदीप यांच्या यशोगाथेची आज सर्वत्र चर्चा आहे.
आजच्या काळात अनेक युवक नोकरी–उद्योगांच्या मागे धावत असताना संदीप सोनवणे यांनी मात्र शेतीकडे वळून बागायती क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वतःकडील दोन एकर शेतीबरोबरच जवळील काही जमीन नफ्याने वटाणे करून त्यांनी एकूण आठ हजार केळी रोपांची लागवड केली. यासाठी त्यांनी मेट्रोजन बायोटेक कंपनीची केळी रोपे घेतली होती. या रोपांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या बागेत भरघोस उत्पादन प्राप्त झाले आहे.
तथापि, सध्या बाजारात केळीला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. संदीप सोनवणे यांच्या बाबतीतही उत्पादन खर्च निघण्यास वेळ लागत असला तरी परदेशी बाजारपेठेमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
संदीप यांच्या केळी बागेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी खत व्यवस्थापन तसेच शास्त्रशुद्ध शेतीविषयक मार्गदर्शन सुशील टेंडर्सचे संचालक जितेंद्र लक्ष्मण पाटील आणि मेट्रोजन बायोटेक कंपनीचे महाराष्ट्र मार्केटिंग हेड रवीकुमार चव्हाण यांनी वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संदीप यांना योग्य उत्पादन घेण्यास मोठी मदत झाली.
संदीप सोनवणे म्हणाले,
“मेट्रोजन बायोटेक कंपनीची केळी रोपे योग्य दरात मिळाल्यामुळे मी मोठ्या प्रमाणावर रोपांची लागवड करू शकलो. शिक्षण झाले तरी आपल्या पारंपारिक व्यवसायाकडे वळून शेतीमध्ये नाविन्य स्वीकारण्याचा निर्णय योग्य ठरला.”
स्थानिक स्तरावरून दुबईपर्यंत पोहोचलेल्या या केळी बागेचे यश हे मेहनत, नवे तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन आणि चिकाटी यांच्या संगमाचे उत्तम उदाहरण ठरले आहे.
मेळसांगवे गावातील युवा शेतकऱ्यांसाठी संदीप सोनवणे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनले असून त्यांच्या यशामुळे परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button