एक दिवसीय नि:शुल्क खो- खो खेळाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात*संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित,सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, ऐनपूर येथे गुरुवार स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर प्रतिनिधी विकास आमोदकर दिनांक 9/04/2026 रोजी खो -खो खेळाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. जळगाव जिल्हा खो- खो असोसिएशन,जळगावचे विशाल पाटील सर राष्ट्रीय पंच तसेच गोपाळ पवार सर, राज्यस्तरीय खेळाडू व जिल्हा पंच,जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशन, जळगाव हे प्रशिक्षक लाभले.प्रशिक्षकांनी अगदी कमी कालावधीमध्ये खो – खो खेळातील बारकावे, नियम प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. खो-खो खेळाडुंच्या बरेच नियम लक्षात आले. विद्यार्थी प्रशिक्षणामुळे खूप आनंदीत झाले. या प्रशिक्षणास मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल, खिर्डी बुद्रुक येथील अ भा पाटील माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी,सरदार पटेल प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा ऐनपूरचे विद्यार्थी,सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. ऐनपूर सरदार पटेल विद्यालयाचे 70 विद्यार्थी, परिसरातील शाळांच्या 117 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदवला. राष्ट्रीय पंच विशाल पाटील सरांनी मैदानावर श्रीफळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मुख्याध्यापक पी आर महाजन सर, उपमुख्याध्यापक जी आर महाजन सर यांनी प्रमुख प्रशिक्षक व परिसरातील उपस्थित शिक्षकांचे स्वागत केले. प्रशिक्षणाला क्रीडा शिक्षक युवराज महाजन, तेजस कुमार शिंदे,विष्णू चारण,अस्वार मॅडम, भूपेश पाटील,अतुल बीरपन सर, वसुंधरा नेमाडे, किरण चौधरी, ऐनपूर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमुख कैलास घोलाणे सर, सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्यु. कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन वाय वाय तडवी सर यांनी केले. तर क्रीडाशिक्षक श्रीकांत महाजन यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींची संख्या अधिक होती. विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून प्रशिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षक व प्रशिक्षण आयोजकांचे आभार मानले.प्रशिक्षणातून आमच्या खेळाचा स्तर उंचावेल व आम्ही निश्चितच स्पर्धेत या नियमांचा वापर करून जिंकण्याची क्षमता विकसित करू असे आश्वासित केले.



