बुलढाणामहाराष्ट्र

वानखेड फाटा ते मनारडी फाटा दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविले दोघेजण गंभीर जखमी…!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

प्रतिनिधी संग्रामपूर,
दि.७/४/२०२६. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळ्याचे रहिवासी शेख रहीम शेखचंद वय वर्ष ६५ आणि नजीर खा राहणार झरी वय वर्ष ५५, हे दोघे दुचाकीने वरवट बकाल मार्गे शेगावला जात असताना वानखेड फाटा ते मनारडी फाटा दरम्यान शेगाव वरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकी वर स्वार असलेल्या दुचाकी ला जोरदार धडक दिल्याने सोनाळ्यातील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत थोडक्यात हकीकत अशी आहे की, सोनाळा येथील रहिवासी शेख रहीम व नजीर खान दुचाकीने शेगाव कडे जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली .दोघे जमिनीवर फेकले गेले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे उपचारासाठी हलवले असता वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोघे जखमीवर प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर अवस्थेत शेख रहीम व नजीर खान या दोघांना शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी हलविले .वृत्तलेपर्यंत अज्ञात वाहन चालका विरुद्ध तामगाव पोलिसात गुन्हे दाखल झाले नव्हते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button