जळगाव जामोद येथे ‘धम्मदेशना समागम’चे आयोजन; बौद्ध धम्माच्या विचारांची उजळणी….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
जळगाव जामोद:- ३ एप्रिल २०२६
डॉ. आंबेडकर विद्यालयात 3 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम मान्यवर भंते यांचे मार्गदर्शन जळगाव जामोद येथे बौद्ध धम्माच्या शिकवणींचा प्रसार आणि समाजप्रबोधनाच्या उद्देशाने ‘धम्मदेशना समागम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. आंबेडकर विद्यालय, जळगाव जामोद येथे पार पडणार आहे.
या समागमात बौद्ध धम्मातील तत्त्वज्ञान, करुणा, समता आणि बंधुता यांसारख्या मूल्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी पतम पूज्य भदंत विश्वु जानज्योती महाथेरो यांचे मार्गदर्शन लाभणार असून, त्यांच्या प्रवचनातून उपस्थितांना जीवनातील सकारात्मक बदलासाठी प्रेरणा मिळणार आहे.
याशिवाय, भदंत जानज्योती भंते, डॉ. भंते धम्मसेवी (सांसदे) तसेच पूज्य भदंत संपपालजी यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या अनुभव पूर्ण विचारांमुळे कार्यक्रम अधिक समृद्ध होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा कार्यक्रम तथागत क्रीडा मंडळ तसेच विशाखा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्म देशनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
समाजात वाढत चाललेल्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर बौद्ध धम्माचे विचार हे शांतता, संयम आणि समतेचा संदेश देणारे ठरत आहेत. त्यामुळे अशा समागमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न होत.असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले…..✍️



