जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगर
मुक्ताईनगरात महावितरणचा निष्काळजीपणा; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
इलेक्ट्रिक पोलच्या धोकादायक स्थितीकडे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्षबातमी :मुक्ताईनगर शहरात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस गाठला असून, स्थानिक नागरिकांच्या घराजवळ उभा असलेला इलेक्ट्रिक पोल गंभीर धोक्याचा विषय बनला आहे. संबंधित पोलची अवस्था अत्यंत धोकादायक असून, कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, याबाबत वारंवार तक्रारी करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आश्चर्यकारकपणे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. मुक्ताईनगर नगर परिसरातील रहिवाशांनी अनेक वेळा महावितरण कार्यालयात जाऊन तसेच अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलट, हा प्रश्न जसाच्या तसा ठेवण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.स्थानिकांच्या मते, सदर इलेक्ट्रिक पोल कधीही कोसळू शकतो किंवा त्यातून विजेचा धक्का लागून एखाद्याचा जीव जाऊ शकतो. एवढ्या गंभीर बाबीकडे प्रशासनाने डोळेझाक करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी सरळ खेळ करण्यासारखे आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, मुक्ताईनगर नगरसेवक आणि यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे ते का दुर्लक्ष करत आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जर तात्काळ उपाययोजना करण्यात आली नाही, तर येत्या काळात मोठा अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे



