प्रवर्तन चौक ते जुनेगाव रस्ता ठरतोय धोकादायक; तात्काळ स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी मुक्ताईनगर नगरसेवक प्रशांत टोंगे यांची मागणी

मुक्ताईनगर जुने गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी.
नगरसेवक प्रशांत टोंगे यांची मागणी.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
. प्रवर्तन चौक ते जुनेगाव रस्ता ठरतोय धोकादायक; तात्काळ स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकापासून जुनेगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) नसल्याने वारंवार छोट्या-मोठ्या अपघातांची शक्यता निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक प्रशांत (गणेश) टोंगे यांनी केली आहे.जुनेगाव परिसरात अंदाजे ८ ते १० हजार नागरिकांची वस्ती असून या मार्गावर जे.ई. स्कूल तसेच जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याशिवाय दर रविवारी येथे आठवडी बाजार भरत असल्याने वाहतुकीची गर्दी अधिक वाढते.दरम्यान, काही टवाळखोर युवक या रस्त्यावर मोटरसायकल अतिवेगाने चालवतात. त्यामुळे नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रवर्तन चौक ते जुनेगाव मुख्य रस्त्यावर तात्काळ स्पीड ब्रेकर बसविण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक प्रशांत (गणेश) टोंगे यांनी मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.



