विदर्भ

शेगाव तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा ..

शेगाव तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा ..
नागरिकांच्या घरात शिरले पाणी, शिवसेनेचे बुलढाणा उपजिल्हा प्रमुख राजू पाटील मिरगे शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांच्या कडून पाहणी..

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

शेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली. नुकसान झालेल्या शेतीची पाहणी शिवसेना बुलढाणा जिल्हा उपप्रमुख राजू पाटील मिरगे, शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी केली. यावेळी जनतेला सुरक्षित आणि सजग रहाण्याचे आवाहन केले. तसेच शेगावचे तहसीलदार समाधान सोनोने साहेब यांना निवेदन दिले तर तहसीलदार साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानी संदर्भात पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती शिवसेना बुलढाणा जिल्ह्याचे उपप्रमुख राजू पाटील मिरगे तर शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी दिली आहे. शेगाव तालुक्यातील विविध गावात पूरस्थिती आहे. काल 18,जुलै ते 21 जुलै दरम्यान अतिवृष्टी झाली. शेगाव तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला. रात्रीच्या सुमारास जोरदार पावसामुळे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. अन्नधान्य व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अतिवृष्टीच्या संकटामुळे नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर सगोडा येथे गावात पाणी शिरल्याने त्याची माहिती तहसीलदार साहेब यांना देऊन त्यांनी तातडीने पाणी बाहेर काढण्याकरिता जेसीबी मशीन उपलब्ध करून दिली तसेच भोनगाव येथे सुद्धा पाहणी केली.. तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतीला सुद्धा याचा फटका बसला आहे. त्यामुळे हे संकट सर्वांसाठीच मोठे संकट ठरले आहे. या नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी असतो. या वेळीसुद्धा त्यांना सर्वकष मदत मिळावी, यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे रामा पाटील थारकर यांनी सांगितलं. यावेळी सगोडा चे सरपंच गोपाल बाठे, विठ्ठल पाटील विभाग प्रमुख, गणेश लांडे, बाळू लांडे, दादाराव मिरगे, रामेश्वर मिरगे, विजय पाटील, किशोर मिरगे, सरपंच भोनगाव सत्यवान मोरखडे, शाखा प्रमुख विठ्ठल भामद्रे , युवा सेना तालुका प्रमुख उमेश शेळके, शेखर शेळके आणि इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button