खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुबईसंपादकीय

RTE 25% प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाची मुदत 18 मार्चपर्यंत वाढवली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

पुणे : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित प्रवेश देण्याच्या प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आता पालकांना 18 मार्च 2026 पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी शैक्षणिक वर्ष 2026–27 साठी राज्यभरातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm_portal⁠� या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येणार आहे. पूर्वी निश्चित केलेल्या मुदतीत अनेक पालकांना अर्ज करता आले नसल्याने ही मुदत वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 च्या कलम 12(1)(क) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी पालकांना ऑनलाईन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.प्राथमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पात्र पालकांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button