बुलढाणामहाराष्ट्र

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावातील गजानन वानखडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड!!! संपूर्ण गावात परिसरात आनंदाचे वातावरण!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

प्रतिनिधी संग्रामपूर, रतन भगत.

दिनांक १० /३/ २०२६:-सविस्तर वृत्त असे की, अथक परिश्रम जिद्द आणि कोणतेही खाजगी क्लासचा आधार न घेता जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील गजानन ज्ञानेश्वर वानखडे यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असून या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे . विशेष म्हणजे भेंडवळ गावातून पीएसआय पदाला गवसने घालणारे गजानन वानखडे हे पहिलेच व्यक्ती ठरलेले आहेत. 

गजानन वानखडे यांनी यापूर्वी अनेकदा राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांचे टप्पे गाठले होते परंतु अंतिम यशाने त्यांना हुलकावणी दिली होती मात्र कसल्याही परिस्थितीत हार न मानता गजानन वानखडे यांनी आपला अभ्यास पुढे सुरूच ठेवला २०२४ च्या एमपीएससी परीक्षेत पूर्व मुख्य आणि मुलाखत अशा तिन्ही कठीण टप्प्यावर मात करत त्यांनी आपले स्वप्न साकार केलेले आहे. गजानन वानखडे यांनी अमरावती येथील गाडगे नगर परिसरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी केली व आपल्या यशाचे श्रेय त्यांनी त्यांचे दैवत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपले आई-वडील आणि मोठ्या भावंडाला दिले आहे. निश्चितच भेंडवळ गावातील गजानन वानखडे यांची पीएसआय पदी निवड झाल्याने भविष्यामध्ये जी काही एमपीएससी यूपीएससी करणारी परिसरातील तरुण मंडळी आहेत त्यांनी गजानन वानखडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही परिस्थितीमध्ये खचून न जाता त्यांनी मनापासून अभ्यास करावा, कारण आपल्याच गावातील एक तरुण याने पीएसआय पदाला गवसणी घातल्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि संपूर्ण ताकदीने अभ्यासाला लागावे म्हणजे पुढचा नंबर आपला सुद्धा असू शकेल…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button