गुरु–शिष्य सोहळ्यातील धावणे स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात…

युवकांनी क्रीडा आणि संस्कारांचा वारसा जपावा : जितेंद्रदादा बोंद्रे
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली….. प्रतिनिधी
आरुना दत्तात्रय खंडागळे
चिखली : सद्गुरू श्री मुंगसाजी महाराज व शिष्य कर्मयोगी सिद्धविनायक बोंद्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठान, चिखली यांच्या वतीने भव्य धावणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्रदादा बोंद्रे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.यावेळी मार्गदर्शन करताना जितेंद्रदादा बोंद्रे म्हणाले की, युवकांनी क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहून शरीरसंपदा व संस्कारांचा वारसा जपावा. अशा क्रीडा स्पर्धांमुळे युवकांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, शिस्त व आत्मविश्वास वाढीस लागतो.
पुरुष गटासाठी १६०० मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात प्रथम क्रमांक वैभव बरडे (चिखली) याने पटकावत ४ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. द्वितीय क्रमांक गौरव भराड (चिखली) याला ३ हजार रुपये, तर तृतीय क्रमांक अनिकेत कांबळे (चिखली) याला २ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.महिला गटासाठी ८०० मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम क्रमांक भाग्यश्री तागवाले (टेंभुर्णी) हिने पटकावत ४ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. द्वितीय क्रमांक गौरी राठोड (चिखली) हिला ३ हजार रुपये, तर तृतीय क्रमांक पूजा मुखमाले (चिखली) हिला २ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत क्रीडाप्रेमी युवक–युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. याप्रसंगी गट्टानी सर, गाडेकर सर, लंके यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.✍🏻



