रावेर पुलिस स्टेशन ची मोठी कामगिरी १२ तासातच लावला उतारकरू मेंढपाळ्याच्या सोने – चांदी च्या दागिण्यांचा धडास्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी विनोद तायडे
रावेर पोलिस स्टेशन हद्दीत दि : २७/ ०२ /२०२६ रोजी मेंढपाळ खंडू भिका धनगर रा : बुरहानपुर वत्सलाबाई रामदास पाटील रा :नेहता त्यांच्याशेतात मेंढया बसलेल्या होत्या . नेहता शिवारात त्यांनी त्यांच्या संसारपयोगी सामान , सोने – चांदी दागिने हे बेलगाडी वर पेटी मध्ये सुरक्षित ठेवले होते
परंतु कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ते चोरुण नेण्याच्या तक्रारीवरूण रावेर पोलिस स्टेशन ला दि : २७/२/२०२६ रोजी गु .रं नं .८५/२०२६ भा न्याय सहित कलम ३०३ ( २) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदर गुन्ह्यात रावेर पोलिस स्टेशन चे निरीक्षक यांनी रावेर गुन्हे शोध पथक तसेच बिट अमलदार यांना तात्काळ सुचना दिल्यानुसार तपासाला लगेचच सुरुवात करण्यात आली होती परंतु सदर घटनास्थळ हे शेतशिवार असल्याचे तेथे तांत्रिक तपासाला अडचन येत होती त्यावेळेस घटनास्थळी असलेले प्रत्यक्ष साक्षीदार यांचे कडे तपास करण्यात आल्यावरूण एक महिला सदर घटनास्थळी संशयीत रित्या फिरत होती असल्याची माहिती बिट अमलदार यांना मिळाल्या वरुण सदर महिला कोण होती?
समजून येत नव्हती परंतु रावेर पोलिसांनी अखेर सदर महिलेची ओळख पटविण्यात यश आले तसेच महिलेला अगोदर विचारपूस केली असता ती उडवा – उडवी चे उत्तरे देत असल्याने तिला विश्वासात घेऊन विचारपुस करण्यात आल्यावर सदर महिलेने गुन्ह्याची कबुली देवून तिचे कडेस असलेला चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी काढून दिलेला आहे
तरी संशयीत महिला हिचे कडून १) १,४२,५००/- किमतीचे महिलांचे हाताती ल ‘ ९९५ ग्रॅम वजनाचे ०३ चांदीचे कडे
२) ३०,०००/- रुपये किमतीचे ०३ ग्रॅम वजनाची कानातील बाही असे संपूर्ण चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई हि मा . डॉ . श्री महेश्वर रेडडी सो . पोलिस अधिक्षक जळगाव ,
मा . श्री .अशोक नखाते सो . अप्पर पो अधिक्षक जळगाव विभाग , मा श्री अनिल बडगुजर पोलिस उपअधिक्षक फैजपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाने पोलिस स्टेशन रावेर मधील पो निरीक्षक डॉ . विशाल जस्ववाल , पो .हे कॉ . विजय चौधरी , पो , हे, कॉ, विक्रम सिसोदे , चैतन्य वानखेडे, रुबाब तडवी, गुन्हे शोध पथकातील
प्रमोद पाटील , श्रीकांत चव्हाण
विशाल पाटिल, सुकेश तडवी, गजानन बोने, यांनी केला आहे .
सदर गुन्ह्याचा पुढील तपास
पो, हे, कॉ विजय चौधरी हे करीत आहे



