चिखली मतदारसंघात नाफेडअंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची आमदार श्वेता ताई महाले यांची मागणी..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली (प्रतिनिधी)
आरुना दत्तात्रय खंडागळे
चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर हरभरा पिकाचे उत्पादन झाले असून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी नाफेड (NAFED) अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
याबाबत आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी मा. श्री. जयकुमार रावल, मंत्री (पणन व वस्त्रोद्योग विभाग), महाराष्ट्र राज्य यांना लेखी पत्राद्वारे विनंती केली आहे. सध्या बाजारभावात चढ-उतार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने हमीभावानुसार हरभरा खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेऊन हरभरा खरेदी केंद्र मंजूर करून सुरू करावे, अशी ठाम मागणी आमदार श्वेता ताई महाले यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आमदार सौ. श्वेता महाले यांच्या प्रयत्नामुळे मतदारसंघातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे…



