हरताळा येथे बिबट्याचा हल्ला; वळू फस्तहरताळा परिसरात बिबट्याने गट नंबर ६६ अशोक बालचंद्र धबाडे यांच्या मालकीच्या शेतात घुसून वळू फस्त केल्याची घटना घडल्याने गावात व शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
मुक्ताईनगर
हरताळा येथे बिबट्याचा हल्ला; वळू फस्तहरताळा परिसरात बिबट्याने गट नंबर ६६ अशोक बालचंद्र धबाडे यांच्या मालकीच्या शेतात घुसून वळू फस्त केल्याची घटना घडल्याने गावात व शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, जंगलाला लागून असलेल्या शेतात बांधलेल्या वळू वर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. जोरदार आवाज ऐकून रात्रीस गस्तीस असलेल्या शेतकऱ्यांनी धाव घेतली; मात्र तोपर्यंत वळू मृत झाला होता घटनेनंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेल्याचे दिसून आले
या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनरक्षक दीपाली बेलदार यांनी प्रत्यक्ष वाघ असल्याचे खात्री करून परिसरात कॅमेरा लावण्यात आले आहे बिबट्याच्या हालचाली लक्षात घेता नागरिकांनी रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच एकट्याने बाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
गावकऱ्यांनी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी जिल्हा वनसरंक्षक राम धोत्रे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांनी केली आहे. वारंवार होणाऱ्या वन्यप्राणी हल्ल्यांमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.



