चिखला. ता. लोणार येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज चिखली बंदची हाक ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण
चिखली : दिनांक 23 . बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला या गावात दि.20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी गावातील सरपंच आणि काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला असता गावातील मराठा समाजातील महिला भगिनींनी विरोध केला असता, सरपंच आणि काही लोकांनी मराठा समाजाच्या महिला भगिनींना अमानुषपणे मारहाण केली,
या घटनेचे प्रडसाद बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. आणि सर्वच स्तरावर घटनेमुळे निषेधाच्या प्रतिक्रिया उंमटू लागल्या , याच धरतीवर आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी चिखली तालुका सकल मराठा समाज आणि शिवप्रेमी जनतेच्या वतीने चिखली बंदची हाक आज देण्यात आली आहे.
या बंदमध्ये . शाळा ,कॉलेज ,दवाखाने, मेडिकल, जीवनावश्यक वस्तूचे प्रतिष्ठाने वगळता इतर सर्व मार्केट बंदरातील. तसेच सध्या 10 वी आणि 12 वी ची परीक्षा सुरू असल्याने स्कूल बस शाळेची खाजगी वाहने सुरू राहतील. तरी या बंदला या शहरातील शिवभक्त आणि शिवप्रेमींनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन कुठेही गालबोट न लागता हा बंद दिवसभर पाळून झालेल्या घटनेचा निषेध नोंदवावा, असे आवाहन सर्वपक्षीय व सर्व चिखलीकर , आणि शिवभक्त शिवप्रेमींच्या वतीने करण्यात आला आहे.
ji



