बुलढाणामहाराष्ट्रविदर्भशैक्षणिक
संग्रामपूर तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न ! पाचवी आणि वर्ग आठवीच्या एकूण १२६९ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा!:-

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत.
सविस्तर वृत्त असे की , दरवर्षी शासनातर्फे वर्ग ५ वीआणि वर्ग ८वी च्या विद्यार्थ्यां ची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असते ,तीच परीक्षा शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून या वर्षी सुद्धा दिनांक २२/२/२०२६ ला देण्यात आली.सदर परीक्षेसाठी तालुक्यातून पीएम श्री जिल्हा परिषद पातुर्डा येथे परीक्षेस बसलेले विद्यार्थी १७३ जिल्हा परिषद केंद्रीय उच्च मराठी प्राथमिक शाळा सोनाळा येथे परीक्षेस बसलेले विद्यार्थी १११ जिल्हा परिषद उच्च मराठी प्राथमिक शाळा टुनकी बुद्रुक परीक्षेस बसलेले विद्यार्थी १४८ जिल्हा परिषद मराठी शाळा वरवट बकाल येथे परीक्षेस बसलेले विद्यार्थी १३४ संग्रामपूर परीक्षेत बसलेले विद्यार्थी ९३ जिल्हा परिषद उच्च मराठी प्राथमिक शाळा एकलारा बानोदा परीक्षेस बसलेले विद्यार्थी ११६ या गावातील शाळेवर पाचवीचे एकूण ७७६ विद्यार्थी विद्यार्थिनी शिष्यवृत्तीचे परीक्षा दिली .तर सोनाजी महाराज विद्यालय सोनाळा परीक्षेस बसलेले विद्यार्थी ४८, आदिवासी माध्यमिक शाळा टूनकी परीक्षेत बसलेले विद्यार्थी १७२, श्री नागेश्वर महाराज वरवट बकाल परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी १४५, वानखडे विद्यालय वरवट खंडेराव परीक्षेत बसलेली विद्यार्थी १२८, या शाळेच्या परीक्षा केंद्रावर आठवीच्या एकूण ४९३विद्यार्थ्यांनी ४ परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा दिली.गावनिहाय शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर ही परीक्षा अत्यंत पारदर्शकरित्या संपन्न झाली. गटशिक्षणाधिकारी टाले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील १० शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर संचालक यांची नियुक्ती करण्यात आली होती .शिष्यवृत्ती परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रावर पोलीस ,होमगार्ड यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता .केंद्र संचालक एम एस जुमडे, या कर्तव्यावर शिक्षिका शीला बोपटे आणि शिक्षक संजय इंगळे शिक्षिका सरला झोपे, राहुल इंगळे ,अनिल धनभर , व्हि. एस .मुरकुटे, संघपाल समदूर ,महेश शेगोकार, संतोष नेमाडे या सर्व शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर आपले कर्तव्य बजावले. तालुक्यात ही शिष्यवृत्ती परीक्षा अत्यंत आनंदात आणि शांततेत पार पडली.
✍️



