खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगरच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘शिवसृष्टी’ला वेग; ऐतिहासिक परिवर्तनाचे साक्षीदार नागरिक

मुक्ताईनगरच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘शिवसृष्टी’ला वेग; ऐतिहासिक परिवर्तनाचे साक्षीदार नागरिक

मुक्ताईनगर ।

मुक्ताईनगर शहराच्या हृदयस्थानी उभारण्यात येत असलेली ‘शिवसृष्टी’ आता अंतिम टप्प्याकडे झेपावत असून, शहराच्या सौंदर्यात आणि ऐतिहासिक ओळखीत भर घालणारा हा प्रकल्प लवकरच आकर्षक रूपात नागरिकांसमोर उभा राहणार आहे. गेल्या वर्षभरात या ठिकाणी झालेला आमूलाग्र बदल सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.सुमारे दीड वर्षांपूर्वी शहरातील बस आगारासमोरील व प्रवर्तन चौकातील त्रिकोणी जागेत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा दिमाखदार सोहळ्यात प्रतिष्ठापित करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणानंतर शिवसृष्टी प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळाली. प्रशस्त गॅलरी, किल्ल्यासदृश भिंती व भव्य प्रवेशद्वार यामुळे परिसराला दुर्गमय स्वरूप प्राप्त होत असून, नागरिकांना इतिहासाचा साक्षात अनुभव देणारे वातावरण निर्माण होत आहे.याच ठिकाणी नुकताच शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. त्या निमित्ताने या जागेची पूर्वस्थिती आणि आताची भव्य रूपांतरणाची झलक पाहून नागरिकांमध्ये समाधान व अभिमानाची भावना व्यक्त होताना दिसली. अतिक्रमण हटाव व जागा स्थलांतराच्या दीर्घ प्रक्रियेनंतर या ठिकाणी उभारलेले शिवस्मारक हे शहराच्या जिद्दीचे प्रतीक मानले जात आहे.या प्रकल्पासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आवश्यक मंजुरी व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पुढाकारामुळे मराठा समाजासह विविध घटकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.शिवसृष्टी प्रकल्पासाठी अंदाजे पाच ते आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, उर्वरित कामांमध्ये आई जिजाऊंचे मंदिर, तिन्ही बाजूंनी संरक्षक भिंती, आकर्षक कारंजे व सुशोभीकरणाचा समावेश आहे. पूर्णत्वास गेल्यानंतर ही शिवसृष्टी मुक्ताईनगरची ऐतिहासिक ओळख अधिक ठळक करेल, तसेच भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button