महाराष्ट्रविदर्भ

ताटीच्या अभंगांनी ज्ञानालाच मुक्त केले.श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.

ताटीच्या अभंगांनी ज्ञानालाच मुक्त केले.
श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.
लोकापवादाला कंटाळून आळंदी स्थित सिद्धबेटातील आपल्या गवताच्या कुटीची ताटी बंद करून बसलेल्या विश्वमाऊलींशी लडिवाळ मुक्ताईने ताटीच्या अकरा अभंगांच्या माध्यमातून प्रेरक संवाद साधून केवळ ज्ञानोबारायांनाच नाहीतर, प्रत्यक्ष गुह्यज्ञानालाच मुक्त केल्याचे गौरवोद्गार भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी काढले.
ते आज ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी संतश्री वासुदेवजी महाराज अवतिर्णोत्सवानिमित्य आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण तथा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानयज्ञ सप्ताहातील प्रवचन प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुक्ताईने ताटीच्या अभंगांच्या माध्यमातून तत्कालीन वर्णव्यवस्थेतील उच्चभ्रूंच्या – अहंकाराच्या, योग्यांच्या – अभिमानाच्या , साधकांच्या – दिशाहीनतेच्या , जनसामान्यांच्या – अज्ञानाच्या ताट्या उघडून प्रत्यक्ष ज्ञानालाच बंधन मुक्त करून लोक सुलभ केले. किंबहुना मुक्ताई कडील हे गृह्यातिगुह्यतत्वज्ञान प्रकट व्हावे याकरिताच विश्व माऊली ज्ञानोबारायांणी आपल्याला क्रोध आल्याची भासवुन ताटी लावून घेण्याची लोकोद्धारक लीला केली. अशाप्रकारे दोन्ही बाजूंच्या दृष्टिकोनातून सप्रमाण युक्तिवाद करून ताटीच्या अभंगांमागील भूमिका विशद करून सांगितल्याचे भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button