बुलढाणा

संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांची २० वर्षा नंतर भरली शाळा

(प्रतिनिधी). राजेंद्र मुंडे

शहरातील सध्या पीएम श्री जि.प. हायस्कूल मध्ये माजी विद्यार्थ्यांचा २० वर्षा नंतर स्नेह मिलन मेळावा संपन्न झाला.

ह्या मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी जि.प. हायस्कूलचे से.नि.प्र. मुख्याध्यापक श्रीरंग ढोकणे होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून याच हायस्कूलची विद्यार्थिनी शिक्षिका तथा से.नि प्रभारी मुख्याध्यापिका चित्राताई राजनकर होत्या. प्रथम राष्ट्रगीत होऊन सरस्वती माता व संत शिरोमणी रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन राष्ट्रगीत झाले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने

त्यांचे सर्व शिक्षकांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी विद्यार्थी अनिलसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविकातून 2005 ते 2006 मध्ये दहाव्या वर्गात असतांना शाळेतील जुने अनुभव व आताचे अनुभव व्यक्त केले. तसेच इतर विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सुद्धा

आताचे नागरिक यांनीही आपआपले अनुभव सांगून शालेय जीवन एका चौकटीत व शिस्तबद्ध होते. आम्हाला सर्व शिक्षकांनी चांगले आचार, विचार व शिक्षण दिले. म्हणून आम्ही नागरिक घडल्याचे सांगितले. पुन्हा २० वर्षानंतर जुन्या मित्रांची शाळा भरली अन् जुन्या गोड आठवणी एकदा पुन्हा ताज्या झाल्याचे नमूद केले. ह्याचवेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला स्पीकर भेट दिले ह्या प्रसंगी मोरणकर सर, राठोड सर, इंगळे सर, मारोडे सर, मेहरकर सर सह सर्व शिक्षक, शिक्षिका कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. व समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन माजी विद्यार्थी प्रवीण वानखडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन विजय अकोटकर यांनी केला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button