गुन्हेगारीजळगावा जिल्हामहाराष्ट्र

मुक्ताईनगर तालुक्यात मनरेगा व घरकुल योजनेत कोट्यवधींचा अपहार?

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असूनही कारवाई नाही – गटविकास अधिकाऱ्याविरोधात निलंबनाची मागणी

जळगाव | प्रतिनिधी:- जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल), गाय-गोठा अनुदान आदी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय निधीचा अपहार, बनावट कामे, खोटे मोजमाप व बनावट लाभार्थी असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.

या प्रकरणात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी लेखी आदेश, स्मरणपत्रे व अंतिम कारणे दाखवा नोटीस (Final Show Cause Notice) दिल्या असतानाही मुक्ताईनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी जाणीवपूर्वक कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप तक्रारदार पंकज रामधन रोटे (रा. राजुरा, ता. मुक्ताईनगर) यांनी केला आहे.

FIR का दाखल झाली नाही?
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानुसारही:
पोलीस किंवा ACB कडे FIR नोंदविण्यात आली नाही.
दोषी अधिकारी, कर्मचारी व लाभार्थींवर फौजदारी कारवाई सुरू केली नाही. वारंवार स्मरणपत्रे, ई-मेल व अंतिम नोटीस असूनही अहवाल सादर करण्यात आला नाही. ही बाब केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नसून दोषींना वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली चालढकल व संगनमत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

कायद्याचे उल्लंघन या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 मधील:कलम 197 (कर्तव्य बजावण्यात जाणूनबुजून अपयश) , कलम 198, 199 (खोटा अहवाल व नोंदींमध्ये फेरफार), कलम 61 व 316 (गुन्हेगारी कट व अपहारास मदत) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत कारवाई होणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निलंबनाची मागणी:- तक्रारदारांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत:
1. गटविकास अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित
करावे
2. शिस्तभंग चौकशी सुरू करावी
3. दोषी सर्व अधिकारी, कर्मचारी व लाभार्थींवर
FIR दाखल करावी
4. स्वतंत्र फौजदारी कारवाईस मंजुरी द्यावी.
न्यायालयात जाण्याचा इशारा :- ७ दिवसांत कारवाई न झाल्यास CrPC कलम 156(3) / BNSS कलम 175(3) अंतर्गत न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button