संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
, माळेगाव बाजार ,आज रविवार दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी आमदार . एडवोकेट जितेंद्र काकडे यांच्या हस्ते माळेगाव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्ञानेश्वर आखरे व डॉक्टर योगेश तायडे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. “मन चंगा तो कठौती में गंगा” असा समतेचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या संत रोहिदास महाराजांचे विचार समाजाला सदैव प्रेरणादायी असून, सामाजिक सलोखा आणि समानतेचा मार्ग दाखवणारे आहेत, असे मत याप्रसंगी व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपस्थित शालिग्राम डामरे, संतोष काकडे, दयाराम डामरे,विजय गायकवाड,गजानन काकडे,गणेश काकडे,गजानन डामरे,प्रमोद वानरे,राजीव वानरे, अमोल वंजारी,अनिल नावकार, रोशन खंडारे,विशाल डामरे, ओम भोपे, रणवीर काकडे,शहादेव तुंबळे,बळीराम खंडारे,ओम काकडे,गौरव भटकर,यश इंगळे,यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



