खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगरच्या व्यापारी विश्वात नवा अध्याय!‘अभी पेंट गॅलरी अ‍ॅण्ड इंटरप्रायझेस’चा थाटात शुभारंभ, आमदार चंद्रकांतभाऊ पाटील उपस्थित

आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहराच्या व्यापारी व औद्योगिक विकासात भर घालणाऱ्या ‘अभी पेंट गॅलरी अ‍ॅण्ड इंटरप्रायझेस’ या नव्या प्रतिष्ठानाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या शुभारंभ सोहळ्यास मा. आमदार श्री. चंद्रकांतभाऊ पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या प्रसंगी बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की, नवीन उद्योग, व्यवसाय आणि उद्योजकतेला चालना मिळाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. ‘अभी पेंट गॅलरी अ‍ॅण्ड इंटरप्रायझेस’सारखे आधुनिक व दर्जेदार व्यावसायिक उपक्रम हे मुक्ताईनगरच्या आर्थिक प्रगतीसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नव्या गॅलरीमध्ये घरगुती व औद्योगिक वापरासाठी विविध प्रकारचे उच्च दर्जाचे पेंट, रंगसामग्री तसेच आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्राहकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
या शुभारंभ सोहळ्यास शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, नागरिक तसेच प्रतिष्ठानचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आभार प्रदर्शन करण्यात आले.
‘अभी पेंट गॅलरी अ‍ॅण्ड इंटरप्रायझेस’च्या माध्यमातून मुक्ताईनगरच्या व्यापारविश्वात एक नवा अध्याय सुरू झाला असून, या उपक्रमाला सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button