स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मिडियम व एकनाथराव खडसे टॅलेंट स्कूल येथे ध्वजारोहण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मिडियम व एकनाथराव खडसे टॅलेंट स्कूल येथे ध्वजारोहण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
मुक्ताईनगर |प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्ताईनगर येथील स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मिडियम स्कूल तसेच श्री. एकनाथराव खडसे टॅलेंट स्कूल येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमानंतर शैक्षणिक, क्रीडा व इतर सहशालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांचे कौतुक करताना मान्यवरांनी, “विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता सामाजिक भान, राष्ट्रप्रेम व चारित्र्यनिर्मितीवर भर द्यावा,” असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाली असून शाळेच्या उपक्रमशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने शिक्षणासोबत संस्कारांची जोड देण्याचा शाळेचा उद्देश अधोरेखित केला.



