संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव येथे 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अति उत्साहात संपन्न! कार्यक्रमाला गटविकास अधिकारी आणि संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत जी पाटील साहेब यांची उपस्थिती!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत आणि भगवान पाखरे.
सविस्तर वृत्त असे की, वरवट खंडेराव तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे 77 वा प्रजासत्ताक दिन हा अति उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंतराव गाळकर हे होते तर गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ.गाळकर मॅडम, उपसरपंच, आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य व वरवट खंडेराव येथील सर्व नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत गाळकर यांनी उपस्थित जनसंवादाला मार्गदर्शन केले. नंतर दुपारच्या सत्रामध्ये संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत वर्ग एक ते सात या वरवट खंडेराव येथील केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा वरवट खंडेराव येथील मुला मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन आपली कला सादर केली. त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी वरवट खंडेराव येथील केंद्रीय शिक्षक श्री दिनेश तायडे सर, प्रमोद काळे सर, मोरे सर, चोपडे सर, वयतकर सर, मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्री हरणे मॅडम यांनी मागील पंधरा दिवसापासून हा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करून घेतली. हा कार्यक्रम अत्यंत आनंदाने संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा बरीच मेहनत करावी लागली.
वरवट खंडेराव येथील मराठी प्राथमिक शाळेला संग्रामपूर तहसीलचे तहसीलदार श्री प्रशांत जी पाटील साहेब, गटविकास अधिकारी पायघन साहेब संग्रामपूर हे सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. हा कार्यक्रम अत्यंत शांततेने संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद काळे सर आणि केंद्रप्रमुख श्री दिनेश तायडे सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पायघन साहेब गटविकास अधिकारी संग्रामपूर यांनी केले, तर त्यांच्यासोबत संग्रामपूर चे तहसीलदार श्री प्रशांत जी पाटील साहेब यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शक मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवावेत असे संबोधले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री मोरे सर यांनी केले.



