बुलढाणा

शिक्षिकेच्या समसूचकतेने वाचली लाख रुपयाची पोत.

हिवरखेड प्रतिनिधी
लहान मुले खेळता खेळता कोणता प्रताप करतील त्याचे काही सांगता येत नाही.. परंतु नशीब बलवत्तर म्हणून एक लाख रुपयाचे नुकसान होता होता वाचले..असाच एक प्रकार हिवरखेड येथे घडला आहे.

सविस्तर असे की हिवरखेड येथील येथील गृहिणी हर्षदा राहुल गिऱ्हे ह्या नित्य नियमा प्रमाणे सकाळी आपल्या मुलाची शाळेत जाण्याची तयारी करत होत्या. त्यांची अंदाजे
सहा ते सात ग्रॅम सोन्याची पोत काढून घरी टेबलवर ठेवलेली होती. त्यावेळी त्या व्यस्त असल्यामुळे त्यांचा नर्सरीत शिकणारा मुलगा प्रियांश ह्याने खेळता खेळता ती सोन्याची पोत खेळणे समजून चुकीने शाळेत सोबत घेऊन गेला. त्यानंतर मित्रांसोबत खेळताना सोन्याच्या पोतीला खेळण्याचा हार समजून वर्गातील सर्व विद्यार्थी त्या सोन्याच्या पोतीला एकमेकांच्या गळ्यात घालत होते. त्याचवेळी शिक्षिका स्वाती रवि गावंडे ह्या वर्गात आल्या. मुले खेळात मग्न असताना ते ज्या खेळण्या सोबत खेळत होते त्याच्यावर शिक्षिकेची नजर गेली. मुलांच्या हातातील खेळणे हे खेळणे नसून सोन्याची पोत असल्याचा त्यांना अंदाज आला. सदर पोत कोणी आणली यांची त्यांनी विद्यार्थ्यांना विचारणा केली असता प्रियांश ने सांगितले की हा हार मी आणला. असे म्हणताच शिक्षिका स्वाती गावंडे यांनी प्रियांश च्या आई हर्षदा गिऱ्हे यांना फोन करून प्रियांशने सोन्याची पोत शाळेत आणली का अशी विचारणा केली. असे ऐकताच हर्षदा गिऱ्हे यांना धक्का बसला आणि त्यांनी आपली पोत घरात शोधणे सुरू केली असता त्यांना मिळून आली नाही. त्यावरून प्रियांशने चुकीने पोत शाळेत नेल्याची खात्री पटली. त्यामुळे शिक्षिका स्वाती गावंडे यांनी झालेल्या प्रकाराची माहिती शाळेतील प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांना दिली. सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड चे कर्मचारी नितीन कोल्हे यांनी प्रियांश चे पालक राहुल गिऱ्हे यांच्याशी संपर्क साधून त्यांना शाळेत बोलावून घेतले. व उपस्थितांनी सदर सोन्याची पोत परत राहुल गिऱ्हे यांच्या स्वाधीन केली. त्यावेळी राहुल गिऱ्हे यांनी म्हटले की जर मुलांच्या खेळण्या खेळण्यात ही पोत कोठेही पडून हरविली असती अथवा चुकीच्या कोणा व्यक्तीच्या हातात लागली असती तर लाख रुपयाचे नुकसान झाले असते. परंतु शिक्षिका स्वाती गावंडे यांनी व त्यांच्या सर्व सहकार्यानी इमानदारीचा प्रत्येक पोत परत केली. त्याबद्दल राहुल गिऱ्हे यांनी शिक्षिका गावंडे मॅडम आणि संपूर्ण सेंट पॉल अकॅडमीच्या स्टाफ चे आभार व्यक्त केले. अशा प्रकारे लहान मुलांच्या खेळाखळात जवळपास एक लक्ष रुपयाचे नुकसान होता होता वाचल्याचा प्रकार पहायला मिळाला.

उपरोक्त झालेल्या प्रकारावरून दोन गोष्टी ठळकपणे जाणवतात

पहिली म्हणजे गृहिणींनी बहुमूल्य वस्तू जपून ठेवाव्यात व मुलांच्या आचरणाकडे विशेष लक्ष द्यावे. तर दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षिकेने दाखवलेली इमानदारी अनेकांना प्रेरणा देऊन गेली. अशाच इमानदारीची आज नितांत आवश्यकता असून सर्वांनी स्वाती गावंडे यांचेपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button