महाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगरमध्ये विषारी डुप्लिकेट दारूचा उच्छाद : नागरिक मरत असताना उत्पादन शुल्क विभाग नेमका कुणासाठी काम करतोय?


मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात अवैध, बनावट व संशयास्पद डुप्लिकेट दारूचा उघडपणे सुळसुळाट सुरू असून, हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या जीवावर चाललेला थेट हल्लाच असल्याचे चित्र आहे. नियम, कायदे आणि शासनाच्या परवानग्यांना केराची टोपली दाखवत ही दारू तयार केली जात असून, ती संपूर्ण तालुक्यात निर्भयपणे पोहोचवली जात आहे.
प्रश्न एकच आहे – राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपेत आहे की जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे?
कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग होत असताना, वाहतूक होत असताना आणि खुलेआम विक्री होत असताना प्रशासनाला काहीच कळत नाही, हे कुणालाच पटणारे नाही.
ही डुप्लिकेट दारू केवळ बेकायदेशीरच नाही, तर ती अत्यंत विषारी असून कुठल्याही क्षणी मोठा अनर्थ घडवू शकते. तरीही संबंधित यंत्रणा निष्क्रिय राहणे म्हणजे या मृत्यूच्या धंद्याला मूक संमती देण्यासारखेच आहे. यामागे प्रशासनाचा आर्थिक हितसंबंध आहे का, असा थेट सवाल आता नागरिक करत आहेत.
राज्यात यापूर्वी बनावट दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, निरपराधांचे प्राण गेले. इतिहासातून धडा घेण्याऐवजी मुक्ताईनगरमध्ये पुन्हा तेच मृत्यूचे कारस्थान उभे राहत असताना, प्रशासनाची शांतता धक्कादायक आणि संशयास्पद आहे.
उत्पादन शुल्क अधिकारी कारवाईची वाट कशाची पाहत आहेत? एखादा मृत्यू झाल्यावरच का जाग येणार?
जर उद्या काही दुर्घटना घडली, तर त्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी कोण घेणार – दारू माफिया की गप्प बसलेले अधिकारी?
आता केवळ नोटिसा, बैठकांचे नाटक आणि कागदी कारवाई नको.
तात्काळ छापे, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स उद्ध्वस्त करणे, दोषींना अटक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना संरक्षण देणारेही तितकेच दोषी आहेत – आणि जनता हे विसरणार नाही.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button