जळगावा जिल्हाबुलढाणा

देऊळगाव राजा येथील ट्रामा केअर सेंटर अखेर कार्यरत. हजारो रुग्णांना दिलासा.

देऊळगाव राजा येथील ट्रामा केअर सेंटर अखेर कार्यरत. हजारो रुग्णांना दिलासा.

प्रतिनिधी

. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस वृत्त संकलन

राजा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर अखेर कार्यरत, धुळखात पडलेली यंत्रसामुग्री आणि रिक्त पदाबाबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी केलेल्या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही महिन्यापासून या केंद्रात तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून हजारो रुग्णांना आरोग्यसेवा दिले जात असल्याची माहिती अधिकृत अहवालातून समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी शासनाकडे एक निवेदन सादर केले होते. या निवेदनात त्यांनी ट्रामा केअर सेंटरमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करूनही आधुनिक यंत्रसामुग्री वापरली जात नसल्याचा आणि डॉक्टरांसह तज्ज्ञांची पदे रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (मंत्रालय) आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून तात्काळ अहवाल मागवला होता. ३ महिन्यात २२२९ हून अधिक रुग्णावर उपचार करण्यात आले असल्याची माहितीही देण्यात आली आहे. वैद्यकीय अध्यक्ष ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा यांनी ५ जानेवारी २०२६ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, ट्रामा केअर सेंटर मधील स्थिती आता सुधारली असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एप्रिल 2024 पासून केंद्रात अस्थिरोग तज्ञ उपलब्ध झाले असून उपचार सुरळीत सुरू आहेत. गेल्या तीन महिन्यात १८०० रुग्णांनी (OPD) सुविधेचा लाभ घेतला. सुमारे १९६ रुग्णांना प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल करून(OPD) उपचार देण्यात आले. या कालावधीत ८९ रुग्णांना प्लास्टर लावण्यात आले.१०७ ठिकाणी (स्लॅब) टाकण्यात आले. आणि २८ किरकोळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या असल्याचे पत्रात म्हटले आहे. ट्रामा केअर सेंटर मधील रिक्त पदाबाबतची आकडेवारी आता सकारात्मक असून केंद्रासाठी एकूण १३ पदे मंजूर झाले आहेत. सध्या स्थितीत १२ पदे भरलेली असून केवळ १ पद रिक्त आहे. डॉ. श्रीकृष्ण चव्हाण (अस्थिवंग शल्य चिकित्सक) एप्रिल २०२५ मध्ये.तर डॉ विलास दराडे (वैद्यकीय अधिकारी) सप्टेंबर २०२४ मध्ये रुजू झाले आहेत. अधिपरिचारिका ३, परिसेविका १, आणि कक्षसेवक ३, यांची पदे पूर्णपणे भरलेली आहेत. सध्या केवळ वाहन चालकाचे एक पद बदलीमुळे रिक्त असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी नागरिक आरोग्याचा प्रश्नावर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग (मंत्रालय) यांना देण्यात आलेल्या निवेदनामुळे आणि या अहवालामुळे देऊळगाव राजा ट्रामा केअर सेंटर आता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे परिसरातील अपघातग्रस्त रुग्णांना आता उपचारासाठी बाहेरगावी धाव घेण्याची गरज उरलेली नाही.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button