माळी समाजाच्या ३२ व्या राज्यस्तरीय युवक-युवती परिचय संमेलनाचे उद्घाटन

सोयर पुस्तिकेचे थाटात विमोचन: पुस्तिकेत ११०० युवती तर ९४५ युवकांच्या नोंदणी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव: माळी समाजाच्या २२ व्या राज्यस्तरीय युवक-युवती तीन दिवसीय परिचय महासम्मेलनाची सुरुवात संतनगरी शेगाव येथे शनिवार १० जानेवारी रोजी करण्यात आली.
पहिल्या दिवशी या मेळाव्याचे उदघाट्न व सोयर पुस्तिकेचे विमोचन माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व उदघाट्क माजी आमदार लक्ष्मणराव तायडे व सौ. कलमताई लक्ष्मणराव तायडे यांनी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासह आयोजन समिती अध्यक्ष प्रदीप सातव कार्याध्यक्ष गणेशराव वैराळे, डॉ. शंकरराव क्षीरसागर, डी. एस. खंडारे, डॉ. भास्कर चरखे, श्रीकृष्णजी बोळे, सुरेशभाऊ गिन्हे, संजय वानखडे, प्राचार्य दिनेश तायडे, गजाननराव राऊत, परसराम बोरहे, राजू असोलकर, रघुनाथजी चोपडे,
महादेव खंडारे आत्माराम जाधव, बंडूभाऊ इंगळे, विजय वावगे, नामदेव बहादरे, योगेश हजारे, अॅड. श्रीकांत तायडे, शत्रुघ्न बिरकड, गजाननजी म्हैसने, गजेंद्र काळे, महादेवराव खंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलनातील सोयर पुस्तिकेचे थाटात विमोचन करण्यात आले. यासह परिचय मेळाव्याचे आजी माजी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती
सोयर पुस्तिकेचे विमोचन करतांना प्रमुख मान्यवरांनी
आपले विचार व्यक्त करत या मेळाव्याच्या करिता ऋणानुबंधसह शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, आर्थिक प्रगती यावर आपले विचार व्यक्त केले. तसेच महाज्योतीने प्रकाशित केलेल्या समग्र वाडमयाचे वितरण करण्यात आले. दरम्यान मेळाव्याचे दिवंगत पदाधिकारी वा त्यांच्या परिवारातील दिवंगतांना मंडळातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सोयर पुस्तिकेत ११०० युवती तर ९४५ युवकांच्या अशा एकूण जवळपास २१०० नोंदणी करण्यात आली आहे. मेळाव्याचे
प्रा. प्रदीप सातव यांच्या अध्यक्षतेखाली व गणेशराव वैराळे यांच्या कार्याध्यक्षाखाली होणाऱ्या या युवक-युवती परिचय महासंमेलनात अकोला विभागाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन देऊळकर, सचिव दिपक रौंदळे, आत्माराम जाधव, अॅड. शंकरराव गिन्हे, गोपाल तायडे, गजानन निमकर्डे, नितीन इंगळे, सुधीर उगले, डॉ. चंद्रकांत बोळे, राजेश तायडे, विनोद इंगळे यासह खामगाव विभागाचे अजय तायडे, विकास बगाडे, श्रीकृष्ण खंडारे, विजय वावगे, पंकज सातव, विनायक जुमळे, रघुनाथ चोपडे, उल्हास वानखेडे, विजय
राखोंडे, एकनाथ इंगळे, मनोज वानखेडे, सुनिल सातव यांच्यासह माळी समाज बहुउद्देशीय मंडळ, युग पुरुष महात्मा फुले प्रतिष्ठान अकोला व माळी सेवा मंडळ खामगांव येथील पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे संचालन अजय तायडे, प्रास्ताविक परिचय संमेलनाचे अध्यक्ष प्रदीप सातव तर आभार प्रदर्शन अनिल गिन्हे यांनी केले. त्यानंतर उपस्थित युवक-युक्तीनी आपले परिचय दिले. बाहेर सोयर पुस्तिकांचे वितरण, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूरच्यावतीने अमरावती विभागीय टीम यांनी उपस्थित समाज बांधताना या योजनेबद्दल मिळणाऱ्या फायद्याची माहिती दिली. तसेच वैद्यकीय क्षेत्राबाबत राज्य कामगार विमा विभाग अमरावती यांनी ईएसआयएस हा तुमचा हक्क असून त्याचा लाभ



