बुलढाणामहाराष्ट्र
अप्पर पोलीस अधीक्षकांनी घेतला सुरक्षेची आढावा बैठक, बैठकीत दिल्या पोलीस पाटलांना सूचना.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी
गजानन खिल्लारे.देऊळगाव
राजा, स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस पाटील यांची अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी बैठक घेऊन हद्दीतील गावांच्या कायदा व सुव्यवस्था च्या दृष्टीने सविस्तर आढावा घेतला. गाव पातळीवरील गुन्हेगारी परिस्थिती, तक्रारी, सामाजिक सलोखा व प्रतिबंधक उपायोजना याबाबत माहिती घेत पोलीस पाटील यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यानंतर पोलीस अधिकारी व अंमलदाराचा दरबार घेण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण केले. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कामकाजाशी संबंधित अडचणी समजावून घेतल्या. तसेच ठाणे हद्दीत यशस्वीरित्या पार पडलेल्या विविध महत्त्वाच्या बंदोबस्त बाबत विशेष कौतुक करण्यात आले.
i



