बुलढाणा

विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे : आनंद जोशी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस हरिदास इंदोरे जळगाव जामोद

जळगांव जामोद विधी कार्यालय तसेच तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा दि 6 जानेवारी रोजी त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालय आसलगांव बाजार येथे संपन्न झाली. यावेळी जळगांव जामोद विधी कार्यालयातर्फे अँड आनंद जोशी साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. व्यासपिठावर एडवोकेट एस एस बावणे. एडवोकेट निशाताई वानखडे. प्रा सुप्रिया इंगळे, यांची उपस्थिती होती. विद्यार्थी जीवनावर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीचा खोल परिणाम होत असतो. त्यातूनच विद्यार्थ्यांची वैचारिक जडन घडन होत असते. व्यसनाचे होणारे दुष्परिणाम ड्रग्स अफू, चरस, गांजा, याचा समुळ नायनाट व्हायला पाहिजे. कारण कायदे तज्ज्ञांची सुद्धा मत आहे असे विचार अँड आनंद जोशी साहेब यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करतांना मांडले. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या आयुष्यात कोणाच्याही दबावात खाली बळी न पडता सुसंस्करीत जीवन कसे जगावे याविषयी अँड निशाताई वानखडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पोस्को कायद्याची विषयक सखोल माहिती देऊन केली. यानंतर अँड एस एस बावणे यांनी संविधानावर आधारित काव्याच्या माध्यमातून प्रबोधन करून उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा सुप्रिया इंगळे होत्या. उपस्थित प्रा रवींद्र निमकडे, प्रा योगेश वारुकार, यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित असल्याचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा शरद गावंडे यांनी कळविले आहे.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button