जळगावा जिल्हाबुलढाणामलकापूरमहाराष्ट्र

देऊळगाव राजा नगरपालिका वर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार) पक्षाचा झेंडा फडकला.

देऊळगाव राजा नगरपालिका वर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार) पक्षाचा झेंडा फडकला.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस.

प्रतिनिधी,गजानन खिल्लारे. नगराध्यक्ष माधुरी तुषार सिपनेचा दणदणीत विजय. देऊळगाव राजा: दीर्घ काळापासून लांबणीवर पडलेल्या देऊळगाव राजा नगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षाने सत्ता काबीज करण्यासाठी चांगलीच कंबर कसली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार) यांची भाजप पक्षासोबत युती करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. माधुरीताई तुषार शिपने ह्या होत्या तर नगर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नेहा बलवंत सुनगत तर शिवसेना पक्षाच्या(उबठा) शोभा कासारे ह्या रिंगणात होत्या. महायुतीच्या सत्तेत असलेले शिनखेड राजा मतदारसंघाचे युवा आमदार मनोज कायदे यांना टक्कर देण्यासाठी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी नगर विकास आघाडी निर्माण केली होती. तर शिवसेना (उबाठा) वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन मोठी ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत करण्यात आला होता. परंतु राजकारणात दिग्गज असलेल्या नेत्यांना धक्का देत जनतेने पुन्हा एकदा आमदार मनोज कायदे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ९ जागा तर भाजपला ३ जागेवर जनतेने बहुमताचा कौल दिला. दुपारनंतर भरभरून झालेल्या मतदानाने मतदाराने मतपेटी मत टाकून त्यांचे पारडे जड करत नगराध्यक्षपदी माधुरीताई तुषार शिंपणे यांना २३६६ मतांचा दीड देऊन दणदणीत विजय केले देऊळगाव राजा नगरपालिका वर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार) पक्षाचा झेंडा फडकवला. तर माजी मंत्री डॉक्टर दिनेश शिंगणे व माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या नगरविकास आघाडीला ७ जागेवर समाधान मानावे लागले. तर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदरात फक्त २ जागा पडल्यात, अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीचा निकाल हाती येताच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये नव चैतन्य निर्माण झाले होते. याप्रसंगी विजयी उमेदवारांची शहरातून भव्य दिव्य विजय मिरवणूक काढत कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत विजय साजरा केला. विजय मिरवणुकीत आमदार मनोज कायंदे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष माधुरी ताई शिकणे, धन श्रीराम शिकणे, राष्ट्रवादी नेते संतोष खांडेभराड, डॉ. गणेश मांटे, भाई दिलीप खरात, तालुका अध्यक्ष प्रा. सदाशिव मुंडे , भगवान मुंडे, प्रा. दिलीप कुमार झोटे, सुभाष दराडे, शेख सिद्दीक सेट, गजानन काकड, सुनील शेजुळकर, छोटू वाघ, शेख नाजिम, सुनील लोखंडे, दीपक चेके, गजानन दंडे, प्रवीण धन्यवाद, निशिकांत भावसार, तुषार शिपने, खंडू मांटे, रवी शेरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व विजयी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button