महाराष्ट्रविदर्भ

ग्रामीण पत्रकारांना न्याय देण्याला प्राधान्य देवू*

*ग्रामीण पत्रकारांना न्याय देण्याला प्राधान्य देवू* *अधिस्विकृती सदस्य.

यदु जोशी* स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे राज्य अधिस्विकृती समीतीचे अध्यक्ष असतांना पहिल्या कार्यकाळात आपण पत्रकारांच्या विविध समस्या शासनाच्या माध्यमातू माडल्या परंतू ज्या उणीवा राहिल्या त्या या नविन टर्म मध्ये दूर करण्याचा प्रयत्न करणार असून यात पत्रकारांच्या संघटनाकडुन मार्गदर्शन घेऊन त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीन यात ग्रामीण पत्रकारांना पुरेपुर न्याय देण्याला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही राज्य अधिस्विकृती समीतीचे नवनियुक्त सदस्य यदु जोशी यांनी दिली.अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाने अमरावती येथील प्राईम पार्क येथे आयोजित सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देतांना बोलत होते. यावेळी मंचावर विभागीय अधिस्विकृृती समीतीचे नवनिर्वाचीत सदस्य,वृत्तकेसरीचे संपादक जयराम आहुजा,अमरावती विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख प्रा.हेमंत खडके,अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रिय अध्यक्ष मनोहर सुने,कार्याध्यक्ष युसुफखांंन, महासचिव सुरेशराव सवळे, प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख,यांची उपस्थिती होती.यावेळी यदु जोशी,जयराम आहुजा व प्रा.हेमंत खडके यांचा पत्रकार संघाच्या केंद्रिय पदाधिकारी व प्रदेशाध्यक्ष यांनी शाल,पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यदु जोशी पुढे बोलतांना म्हणाले की आपल्या लेखनीद्बारे समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय द्या.प्रामाणिक लेखनीत मोठी ताकद आहे.हीच लेखनी आपली व वृत्तपत्राची प्रतिमा व प्रतिभा उंचावण्यास सहाय्यभूत ठरते आपल्या या आधीच्या अधिस्वाकृती अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील कार्याबद्दल बोलतांना जोशी म्हणाले की,ज्या पत्रकाराचे वय ५० आणि पत्रकारीतेतील सेवा २० झाली त्यांना शासनाने अधिस्विकृती देण्याचे परिपत्रक काढले.मात्र परिपत्रक रद्द केल्याचे नव्याने परिपत्रक न काढता याची अमलबजावणी स्थगीत केली.ही अमलबजावणी सुरु करण्यासाठी प्रयत्न केले मात्र सरकारच बदलले आणि प्रकरण प्रलंबित राहीले.यासाठी पुन्हा प्रयत्न करणार असून यावेळी ग्रामीण पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना शासनाच्या अधिस्विकृतीसह इतर योजनांचा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार असून यासाठी अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे मार्गदर्शन घेऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही यदु जोशी यांनी दिली.*पत्रकार कल्याण मंडळ स्थापन करण्याची मागणी* या दरम्यान अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन यदु जोशी यांना दिले त्यात पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर सुने यांनी पत्रकारांसाठी पत्रकार कल्याण मंडळाची स्थापना करण्याची मागणी रेटुन धरली,या मंडळाच्या माध्यमातुन पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबाला मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.या मागणीला जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या टर्म मध्ये हा मुद्दा प्रामुख्याने शासन दरबारी मांडुन पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button