बुलढाणा

अकोट ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाडएक दुचाकीसह ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त

अकोला, ब्युरो.प्रतिनिधी.राजेंद्र मुंडे.अकोट पोलिसांनी अंजनगाव रोडवरील पठार नाल्याजवळ सुरू असलेल्या एका जुगार अड्डयावर धाड टाकून चार जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम व एक दुचाकीसह ६८ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अकोट पोलिस पथकाने पंचांसमक्ष जुगार अड्डड्यावर धाड टाकली असता त्यावेळी ५२ ताश पत्यांवर पैशांची हारजीत करून जुगार खेळताना चार आरोपी रंगेहाथ पकडण्यात आले. यामध्ये नदीम खाँ मुस्ताक खाँ (३७, रा. इफ्तेखार प्लॉट, अकोट), शाम ठाकूर (४५, रा. गवळीपुरा, अकोट), विष्णु कायवाटे (२५, रा. ढोरपुरा, अकोट), आशिष शर्मा (५२, रा. विजय टॉकीजजवळ, अकोट) आरोपींच्या अंगझडतीत व या

घटनास्थळावरून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये नगदी रक्कम १३ हजार १७० रुपये, मोटरसायकल (एमएच-३०-एएस-४३६७) किंमत ५५ हजार, ५२ तास पत्ते असा एकूण मुद्देमाल ६८ हजार १७० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून चारही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनात व सहायक पोलिस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button