अजित पवारांच्या दुसऱ्या मुलाची टॅंगो नावाची दारू कंपनी. हर्षवर्धन सपकाळ यांचे खडेबोल.

प्रतिनिधी
प्रफुल्ल पहुरकर
मुंबई. कोरेगाव पार्क परिसरातील ३०० कोटी रुपयांचा जमीन खरेदी-विक्रीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीच्या आर्थिक नोंदींमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार या कंपनीचे भागीदार असून, या कंपनीने गेल्या चार वर्षांत व्यवसायातून एकही रुपया महसुली उत्पन्न मिळविले नसल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाकडील कागदपत्रांनुसार उघड झाले आहे. याचबरोबर इतरही अनेक बाबी समोर आल्या आहेत. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवार यांच्या दुसऱ्या मुलाचे नावे टॅंगो कंपनी असल्याचे सांगितले आहे. आणि अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असे प्रसार माध्यमांना सांगितले आहे.



