बुलढाणामहाराष्ट्र

शेगावमधील जुगारावर दबंग कारवाई६२ लाखांचा मुद्देमाल जप्त; ६१ जणांवर गुन्हे एएसपी श्रेणिक लोढा यांचा पुढाकार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर
विदर्भ ब्युरो चिप

शेगाव: खामगाव येथील अप्पर
पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकाने शेगाव येथील आदर्श रिसॉर्ट मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर घाड टाकुन जुगार खेळणाऱ्या साठ जणांना रंगेहाथ पकडले. यावेळी त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ३१ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. खामगावचे एएसपी श्रेणिक लोढ़ा गांच्या पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचान्यांनी शेगाव खामगाव मार्गावरील आदर्श रिसॉर्टवर छापा मारला असता त्यांना ६० जण जुगार खेळताना मिळून आले. यावेळी
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख १७लाख ५२ हजार ३२० रुपये १२ चार चाकी वाहने, ५ मोटारसायकली व ५२ मोबाइल असा एकूण ६२ लाख २ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी खामगाव येथील अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन
पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून आदर्श रिसॉर्टच्या मालकासह ६१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोहा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पाटील, पोहेकों प्रभंजन जोशी, पोकाँ शिवशंकर
वायाळ, सहायक पोलिस निरीक्षक बाळू डाबेराव, पोहेकों गोपाल सातव, शेख मुजीब, नितीन पाटील, संदीप गवई, पोकों अमरदीप ठाकूर, आशिष ठाकूर यांनी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बारिंगे हे करत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केलेल्या आरोपींगध्ये जळगाव
खान्देश जिल्ह्यातील कानडा, चोपडा, पाचोरा, पुंजाळे, निंभोरा, माहेजी, महाबळ, जळगाव खान्देश येथील तर अकोला जिल्ह्यातील अंदुरा, आडगाव बुद्रुक, अकोट येथील तर जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, अंत्री, बोराखडी, मोताळा, एकलारा, पळशी येथील आरोपींचा समावेश आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button