महाराष्ट्रमुबई

महिलेविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट, देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार.

महिलेविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट, देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी प्र. ता. गजानन खिल्लारे.

शहरातील एका महिलेविरुद्ध फेसबुक वर अपलोड केल्याप्रकरणी दत्ता कायद्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फेसबुक अकाउंट वर 19 ऑक्टोंबर रोजी दुपारी ही पोस्ट निदर्शनास आली. या पोस्टमुळे महिलेच्या भावना दुखावल्या असून, या माध्यमातून जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या आरोप तक्रारकर त्यांनी केला आहे. या घटनेबाबत देऊळगावराजा पोलीस ठाण्यात संबंधित फेसबुक अकाउंट विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा, अनुसूचित जाती ,जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, तसेच भारतीय दंड संहिताच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात आमदार मनोज कायदे यांचे बंधू सतीश कायंदे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सदाशिव मुंडे, दीपक बोरकर, राजेंद्र अंभोरे, प्रदीप हिवाळे, गणेश डोके, पवन झोरे, पूजा खांडेभराड, किशोर खांडेभराड, सचिन आंधळे, काशिनाथ खांडेभराड, अरविंद खांडेभराड, पवन बोराटे, मनोज खांडेभराड, प्रभाकर खांडेभराड, यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. सर्वांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दत्ता कायदे बनला होता तो तया जिल्हाधिकारी. महिलेविरुद्ध अमानकारक मजकूर समाज माध्यमावर टाकणारा दत्ता कायदे हा सिनखेडराजा तालुक्यातील देऊळगाव कोळ येथील रहिवासी आहे. गेल्या काही वर्षापासून तो पुणे, मुंबई या परिसरात वास्तव्यास आहे. 12 डिसेंबर 2023 दिवाळीनिमित्त गावाकडे आला होता स्वतः जिल्हाधिकारी किरण पाटील म्हणून वावरत होता. स्वतःच्या गाडीला अंबर दिवा लावून अवैध रेतीची वाहने आडून रक्कम वाढत होता. भिंग फुटल्यानंतर त्याची हे तेच धुलाई करण्यात आली होती. या प्रकरणात देखील अंडेरा पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा दाखल झालेला आहे. तेढ निर्माण करणाऱ्याची गय केली जाणार नाही: ब्रह्मगिरी सोशल मीडियावर कोणत्याही समाज, धर्म किंवा जाती विषयी आक्षेपार्ह, अपमानास्पद मजकूर प्रसारित करू नये, अन्यथा संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा ठाणेदार ब्रह्मगिरी यांनी यावेळी दिला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button