बुलढाणामहाराष्ट्रराजकीय

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने संतोषकुमार राऊत सन्मानित

हिवरखेड ( रूप)
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित शासकीय समारंभात अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संतोषकुमार काशिनाथ राऊत यांना शिक्षण, क्रीडा, सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी “क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

     हा सन्मान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे शिक्षकांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरविले. समारंभाला विधानसभेचे सभापती ॲड.राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, विधान परिषदेचे सदस्य जगन्नाथ अभ्यंकर,आमदार मनीषा कायंदे,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे, राज्याचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण संचालक डॉ.महेंद्र पालकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.           

 सन १९९७ मध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात करणारे संतोषकुमार राऊत यांनी दोन दशकांहून अधिक काळ अध्यापन, विद्यार्थी कल्याण, क्रीडा प्रबोधन आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि शिस्तीबाबत जनजागृती निर्माण केली तसेच अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अध्यापनप्रक्रियेत गुणवत्ता वाढविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात यश संपादन केले असून अनेक विद्यार्थी लष्कर, पोलीस आणि शासकीय सेवांमध्ये दाखल झाले आहेत.

   राऊत यांनी कनिष्ठ महाविद्यालयात शारीरिक व आरोग्य शिक्षणाबरोबरच इंग्रजी, मराठी व सहकार विषयांचे अध्यापन करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर घातली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्राचे केंद्रसंयोजक म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसोबतच नोकरदारांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. तसेच मुक्त विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि अकोला–बुलढाणा जिल्हा एनएसएस समन्वयक म्हणून त्यांनी युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना दृढ केली. त्यांच्या पर्यावरण संवर्धन कार्याची दखल घेऊन तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते विद्यालयाला राष्ट्रीय हरित सेनेचा पंचतारांकित पुरस्कार मिळाला.

महात्मा फुले शिक्षण संस्था यांनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन २०२३ मध्ये त्यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातून शाळेच्या निकालात लक्षणीय वाढ झाली, शिष्यवृत्ती व विविध परीक्षा परिणामकारक ठरल्या, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक अभिनव उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमात शाळेला तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवता आला.

    आपल्या सन्मानाबद्दल मुख्याध्यापक राऊत यांनी हा सन्मान माझे आई-वडील, गुरुजन, संस्थेचे संस्थापक स्व. सहदेवराव उपाख्य दादासाहेब भोपळे, लोकनेते स्व.ज्ञानदेवराव गिऱ्हे,संस्थेचे समस्त पदाधिकारी,संचालकगण, वरिष्ठ अधिकारी, धामणी व हिवरखेड येथील गावकरी,माजी शाळेचे मुख्याध्यापक,सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार, आप्तेष्ट, खेळाडू,पत्रकार बांधव,आदीच्या सहकार्य व प्रेरणेतून प्राप्त झाल्याची भावना व्यक्त केली.

 शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन शिक्षण विभागाच्या वतीने क्रीडा विभागातून राज्यात मिळालेला हा एकमेव पुरस्कार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button