बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक

सचिन तोताराम गवई यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

संपन्नस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, चिखली

(प्रतिनिधी – शारदा पवार):

, चिखली येथे सचिन तोताराम गवई यांच्या सेवापूर्ती निमित्त सन्मान सोहळा मोठ्या औत्सुक्याने पार पडला. भारतीय सेनेमध्ये उणीपुरी १९ वर्षे देशसेवा बजावून स्वतःचा आणि देशाचा गौरव वाढवणाऱ्या गवई यांचा गौरव करण्यासाठी ग्रामस्थ, कुटुंबीय आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सचिन गवई यांनी देशाच्या सीमांवर प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत, आपल्या कुटुंबापासून दूर राहून, बर्फ, पाऊस, वाळवंट आणि अडचणींमध्ये प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कर्तव्य बजावले. देशाच्या रक्षणासाठी त्यांनी झुंज दिली, संकटांचा सामना केला आणि जीव धोक्यात घालून सेवा केली. त्यांच्या समर्पणामुळे आज देशवासीय सुरक्षित आहेत.सन्मान सोहळ्यात गायक, कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. गवई यांच्या आई-वडील, पत्नी व मुलांसह उपस्थितांनी त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.सेवापूर्ती सन्मान सोहळ्यात मान्यवरांनी उपस्थितांना सैनिकी जीवनाचे महत्व सांगितले आणि सैनिकांच्या त्यागाची आठवण करून दिली. आई-वडील, पत्नी, मुले आणि समाजासाठी परतलेले सचिन गवई आजही देशप्रेमाची ज्योत जागवित आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button