जळगावा जिल्हामहाराष्ट्र

पिंपळा येथे तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

(प्रतिनिधी – स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, मुक्ताईनगर)

मुक्ताईनगर – तालुक्यातील पिंपळा गावात एका २२ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत तरुणाचे नाव भागवत पुरषोत्तम परोळकर (वय २२) असे असून, तो पिंपळा येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, भागवत परोळकर हा दिनांक १ ऑक्टोबरच्या संध्याकाळी घराबाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. शोध घेत असताना, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी पिंपळा शिवारातील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.

ओळख पटविल्यानंतर तो भागवत परोळकर असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक चौकशीत पोलिसांना असे समजले की, भागवत हा काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त होता. शेतातील झाडाला गळफासासाठी दोर बांधून त्यानंतर विहिरीत उडी मारल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

मृतकाचे वडील पुरषोत्तम जानराव परोळकर (वय ५२, व्यवसाय – शेती व मजुरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत कोणावरही संशय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे पिंपळा परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button