जेष्ठ पोलीस अधिकारी व बौद्धाचार्य आयु. रघुनाथ नागो पोहेकर यांचे दुःखद निधन

नायगांव, ता. मुक्ताईनगर (जि. जळगाव) – येथील रहिवासी व सेवानिवृत्त महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच श्रामणेर/बौद्धाचार्य आयु. रघुनाथ नागो पोहेकर (वय ८१) यांचे दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांनी आपल्या सेवाकाळात पोलिस खात्यात कार्यरत असताना प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली. सेवा निवृत्तीनंतर त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारप्रसारासाठी स्वतःला वाहून घेतले आणि अनेक ठिकाणी बौद्धाचार्य व मार्गदर्शक म्हणून कार्य केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व शिस्तप्रिय, प्रगल्भ विचारांचे व समाजहिताचा सातत्याने विचार करणारे होते.
त्यांच्या निधनामुळे नायगाव व परिसरात शोककळा पसरली आहे .त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलं,तीन मुली,सुन,नातवंडे,जावाई असा परिवार आहे.
ते प्रमोद व मनोज पोहेकर यांचे वडील होत .



