खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र
संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात पार पडली!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
रतन भगत,
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी.
सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर तालुक्यातील वरवट (खंडेराव) येथे दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी शनिवार या दिवशी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा वरवट (खंडेराव) येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या शिक्षण परिषदेचे उद्घाटन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री वसंत भाऊ गाळकर वरवट (खंडेराव),केंद्रप्रमुख व प्रमुख मार्गदर्शक श्री दिनेश तायडे सर,मुख्याध्यापिका कुमारी माधुरी हरणे मॅडम,श्री सोमनाथ सुसतकर सर (मुख्याध्यापक खिरोडा),तसेच श्री मनोहर खंडेराव सर (मुख्याध्यापक कळमखेड) यांची प्रमुख उपस्थिती होती.
परिषदेमध्ये नव्याने बदली होऊन केंद्र शाळा वरवट( खंडेराव )येथे रुजू झालेले सहाय्यक शिक्षक श्री हरिहर मानकर सर यांचे पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.
शैक्षणिक कार्यात शिष्यवृत्ती परीक्षा,नवोदय परीक्षा,भविष्यातील शिक्षण व पद्धती,गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण तथा निपुण महाराष्ट्र,शालेय भौतिक सुविधा,नवभारत साक्षरता परीक्षा,व पेपर वाटप,कार्यालय सूचना,यु-डायस,आधार अपडेट आधी विषयांवर केंद्रप्रमुख श्री दिनेश तायडे सरांनी महत्त्वाचे असे मार्गदर्शन केले.शैक्षणिक उपक्रम ,अध्ययन व अनुभव,अध्ययन निष्पतीवर,श्री भास्कर डोसे सर (मुख्याध्यापक हिंगणा )यांनी मार्गदर्शन केले.
या शिक्षण परिषदेला वरवट (खंडेराव) केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होते.शैक्षणिक गुणवत्ता विकासावर विचार मंत्र होऊन सर्व शिक्षकांनी आपापले अनुभव मांडले.
संग्रामपूर तालुक्यातील केंद्र वरवट (खंडेराव )येथील शिक्षण परिषद उत्साह पूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.
या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन श्री भास्कर डोसे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री दत्तात्रय मुंडे सर यांनी केले.
✍️.



