खडसे महाविद्यालयात संवाद-कौशल्य विषयावर कार्यशाळा संपन्न*मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी.जी. खडसे

*महाविद्यालयात इंग्रजी विभागाद्वारे दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी, तृतीय वर्ष संगणक विभागाच्या विद्यार्थ्यांकरिता एक दिवसीय *’संवाद कौशल्य व सॉफ्ट स्किल्स’* कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य व पीएम-उषा समन्वयक डॉ.अनिल पाटील उपस्थित होते. कार्यशाळेच्या मार्गदर्शन प्रसंगी डॉ. पाटील यांनी संवाद कौशल्य हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक घटक असून, आपल्या संवाद कौशल्यावरच आपल्या जीवनाचे यशापयश व बऱ्याच समस्यांचे मूळ अवलंबून असते, तसेच सौम्य कौशल्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने आपली भाषा, आपला संवाद आणि देहबोली हेच आपल्या जीवनाला आकार देत असतात म्हणून प्रत्येकाने संवाद कौशल्याचा पैलू विकसित करावा असे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य महाजन यांनी आधुनिक काळात संवाद शैली हरवत चालली असून आपण नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवाद कौशल्य विकसित करून आपला सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून या कार्यशाळेमुळे जीवनात व रोजगार निर्मितीत संवाद कौशल्य किती महत्वाची आहेत याची जाणीव झाल्याचे नमूद केले. या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे व डॉ. वंदना चौधरी यांची विशेष उपस्थिती होती. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.जी.एस. चव्हाण यांनी समन्वयक म्हणून प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. उदय अढागळे यांनी केले, या कार्यशाळे प्रसंगी महाविद्यालयातील तृतीय वर्ष संगणक विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री. चंद्रकांत नेमाडे व श्री. प्रमोद तायडे व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



