संत चोखामेळा खडकपूर्णा धरणाची 19 वक्रद्वारे उघडली. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संत चोखामेळा खडकपूर्णा धरणाची 19 वक्रद्वारे उघडली. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा.
सध्या राज्यभरात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. या पावसाचा जोर कायम असल्याने संत चोखामेळा खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन प्रकल्प 100 टक्के भरला आहे. अशातच मंगळवारी दिनांक/16/प्रकल्पाची 19 वक्रद्वारे 50से.मी. ने उघडण्यात आली आहे. त्यातून नदीपात्रात 1326.96घ पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या 33 गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या संत चोखामेळा खडकपूर्णा प्रकल्प क्षेत्र परिसरात सतत धार पावसाने प्रकल्पात जलसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. सध्या प्रकल्प (ओव्हर फ्लो) च्या स्थितीत पोहोचला आहे. प्रकल्पाची संचय पातळी ५२०.५०० मिटर दलघमी एवढी पाणी पातळी असून. मंगळवारचा उपयुक्त साठा ९३.४०४ दलघमी एवढा आहे. प्रकल्प क्षेत्रात मंगळवारी ४२ मी मी पाऊस झाल्याने प्रकल्प १०० टक्के भरला आहे. परिसरात एकूण ७४९ मिमी पाऊस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. संत चोखामेळा खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले. दरम्यान १३२६.९६ घ मीने ४६८५४.९६ क्युसेक नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. प्रकल्पातील पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या ३३ गावांना संत चोखामेळा खडकपूर्णा प्रकल्प नियंत्रण कक्ष व तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला. ता. प्र. स्टार भारत गजानन खिल्लारे. दे.राजा



