केंद्र सरकारच्या आदेशानुसार समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर भुसावळ येथे संपन्न

केंद्र सरकारच्या आदेशानुसार समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर भुसावळ येथे संपन्न
भुसावळ – भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल जिल्हा शाखा जळगाव पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर भुसावळ येथील संबोधी बुद्ध विहार, माता यशोधरा नगर येथे उत्साहात पार पडले.शिबिराची सुरुवातशिबिराची सुरुवात भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पर्यटन सचिव आद. के. वाय. सुरवाडे गुरुजी व जिल्हा अध्यक्ष रवींद्रजी वानखेडे गुरुजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर राज्य संघटक लता ताई तायडे, जिल्हा अध्यक्षा प्रियांका ताई अहीरे, सरचिटणीस सुशिलकुमार हिवाळे यांनी भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. जिल्हा हिशोब तपासनीस सुमंगल तथा रविंद्र अहिरे गुरुजी यांनीही पुष्प अर्पण केले.यानंतर त्रिसरण व पंचशील घेऊन शिबिराचे उद्घाटन झाले. जिल्हा सचिव ए. टी. सुरडकर यांनी नावनोंदणी व ध्वजारोहण पार पाडले.मार्गदर्शन व प्रशिक्षण“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल का निर्माण केले?” या विषयावर ले. कर्नल युवराज नरवाडे यांनी मार्गदर्शन केले.यानंतर सैनिकांना कदवा लाइन, सावधान-विश्राम, तेज चल, कदमताल, ड्रिल, वरिष्ठ अधिकाऱ्यांना सॅल्युट, जनरल सलामी आदी शिस्तीचे प्रशिक्षण ले. कर्नल रमेश सावळे व अन्य प्रशिक्षकांनी दिले.समारोप व शुभेच्छासायंकाळी झालेल्या समारोप कार्यक्रमात एक महिला व एक पुरुष सैनिकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुमंगल तथा रविंद्र अहिरे गुरुजी, प्रियांका ताई अहीरे, सुशिलकुमार हिवाळे, युवराज नरवाडे, रमेश सावळे, रवींद्र वानखेडे तसेच पर्यटन सचिव के. वाय. सुरवाडे यांनी शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन एस. पी. जोहरे यांनी केले.उपस्थित मान्यवर व पदाधिकारीया शिबिरात जळगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, यावल, जामनेर तालुका तसेच भुसावळ शहरातील पदाधिकारी, महिला सैनिक व युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. एकूण २५ महिला सैनिक, ६५ पुरुष सैनिक व २ अधिकारी शिबिरात सहभागी झाले.



